विदर्भ एक्सप्रेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह

0

लोकशाही न्युज नेटवर्क

प्रवासी महिलेचा मृतदेह गोंदियाहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या विदर्भ एक्स्प्रेसमध्ये आढळला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. कसारा रेल्वे स्थानकावर इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे ही रेल्वे थांबवण्यात आली. यावेळी महिलेचा मृतदेह आढळून आला .

तांत्रिक बिघाड झाल्यानंतर कसारा रेल्वे स्थानकावर रेल्वे थांबली असता एक महिला प्रवासी मयत झाल्याचे आढळून आले आहे. मयत महिला ट्रेनमध्ये एकटीच प्रवास करत होती अशी माहिती मिळत आहे.एक्सप्रेसमधील सर्व प्रवाशांना बलिया एक्स्प्रेसने कल्याणच्या दिशेने रवाना करण्यात आले आहे. महिलेचा मृतदेह कसारा रूग्णालयात हलवण्यात आला .

Leave A Reply

Your email address will not be published.