करपात्र निवृत्ती वेतनधारकांना करप्रणालीची निवड करणे आवश्यक

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये करपात्र निवृत्तीवेतन धारकांनी निवडलेल्या करप्रणालीची माहिती कोषागारास देणे आवश्यक आहे. त्यानुसार कोषागार निवृत्तीवेतनावरील टीडीएस अर्थात उद्मम करकपात करेल. असे सुभाष गुंजाळ, जिल्हा कोषागार अधिकारी, जळगांव यांनी कळविले आहे.

करपात्र निवृत्ती वेतनधारकांना जुनी करप्रणाली किंवा नवी करप्रणाली निवड करायची आहे याबाबतची माहिती कोषागार कार्यालयास न दिल्यास नवी करप्रणाली लागू करून त्याआधारे करकपात केली जाईल, असे केंद्रीय प्रत्यक्ष करमंडळाने (सीबीडीटी) स्पष्ट केले आहे. वर्ष २०२३ च्या अर्थसंकल्पात प्राप्तिकर कायदा, १९६१ मधील बदलांची घोषणा केल्यानंतर प्राप्तिकर विभागाने नवे परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार नवी करप्रणाली आता सर्वांना लागू झाली असून, आर्थिक वर्ष २०२२-२३ अखेर जुनी करप्रणाली हा अपरिहार्य पर्याय होता. आता नवी करप्रणाली लागू झाल्याने एखाद्या व्यक्तीला करवजावटींच्या सवलतींचा फायदा घ्यायचा असेल तर त्या व्यक्तीने करप्रणालीची निवड करणे आवश्यक आहे. असेही गुंजाळ, जिल्हा कोषागार अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.