विद्युत पंप सुरु करताना विजेचा धक्का लागल्याने तरुणाचा मृत्यू

0

वरणगाव ;- शेतात काम करत असताना पिकांना पाणी देण्यासाठी विहिरीतील विद्युत मोटार चालू करण्यासाठी गेलेल्या तरुणाला विजेचा जोरदार झटका बसला. यात तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भुसावळ तालुक्यातील बोहार्डी शिवारात घडली. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

बोहार्डी (ता. भुसावळ) येथे वास्तव्यास असलेला सुनिल हरसिंग आकाडे (वय २८) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. सुनील आकाडे हा नेपानगर (जि. बऱ्हाणपूर मध्यप्रदेश) येथील मूळ रहिवाशी असून तो मजुरी कामासाठी कुटुंबासह बेहार्डी शिवारातील शेतात वास्तव्याला होता. शेतातील कामे करून तो उदरनिर्वाह करत होता. दरम्यान ९ एप्रिलला दुपारी विहीरीत पाण्याची ईलेक्ट्रीक मोटार सुरू करण्यासाठी गेला असता त्याला विजेचा जोरदार धक्का बसला.

विजेचा झटका बसल्याने सुनील हा फेकला गेला. यात तो जखमी झाला होता. जखमी अवस्थेत त्याला वरणगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मयत घोषीत केले. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.