तलवारीने दहशत माजवणारा पोलिसांच्या ताब्यात

0

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

भुसावळ तालुक्यातील टहाकळी येथे  हातात तलवार घेऊन दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने फिरवणाऱ्या तरुणास वरणगाव पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

तालुक्यातील टहाकळी गावातील तरुण आकाश प्रल्हाद सोनवणे (वय २३ ) हा गेल्या दोन दिवसांपासून गावातील नागरिकांना हातात तलवार घेऊन दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने गावात फिरत असल्याची गुप्त माहिती वरणगाव पोलीसांना मिळताच सह पोलीस निरिक्षक आशिष अडसुळ यांच्या पथकातील पोहेकॉ नावेद अली, पोकॉ योगेश पाटील, पोकॉ साहेबराव कोळी यांनी टहाकळी गावात सापळा रचून आकाश सोनवणे याला ताब्यात घेतले.

दरम्यान त्याची चौकशी केली असता त्याच्या घराजवळील गुराच्या गोठ्यात गोणपाटात लपवून ठेवलेल्या तलवारीसह पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले. तसेच आणखी काही शस्त्र त्याच्याकडे आहे का? यासाठी पोलीस त्याची कसून चौकशी करीत आहे. याबाबत वरणगाव पोलीस स्टेशनला संशयीत आरोपी विरोधात भारतीय हत्यार कायदा कलम ४ / २५ प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास पोहेकॉ नावेद अली हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.