मृत्यूतांडव ! घाटी रुग्णालयात 10 रुग्णांचा मृत्यू

0

छत्रपती संभाजीनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

छत्रपती संभाजीनगरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालय हे एक मोठ रुग्णालय असून 12 ते 14 जिल्हे या रुग्णालयावर अवलंबून आहेत. येथे दररोज हजारो रुग्ण इथे उपचारासाठी येत असतात. मात्र शासकीय रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघड झाला आहे. सोमवारी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 24 तासात तब्बल 24 रुग्णांचा मृत्यू झाला. तर घाटी रुग्णालयात मागच्या 24 तासात 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 10 मृतांमध्ये 2 बालकांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घाटी रुग्णालायत ज्या रुग्णांचा मृत्यू झालाय, त्यांना बाहेरच्या रुग्णालयातून पाठवण्यात आलं होतं. दरम्यान घाटी रुग्णालयात 15 दिवस पुरेल इतकाच औषधांचा साठा असल्याची माहिती आहे. काही महिन्यांपूर्वी कळव्याच्या एका रुग्णालयात एकाच रात्री तब्बल 17 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती.

हाफकीनने औषधी खरेदी बंद केल्यामुळे राज्यभरातील शासकीय रुग्णालयात औषधांचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांना वेळेत औषधे पुरवठा होत नसल्याने जीव गमवावा लागत आहे. असाच धक्कादायक प्रकार नांदेडमधल्या शासकीय रुग्णालयात पुढे आला आहे. राज्य सरकारने  याची दखल घेऊन आवश्यक पावल उचलली पाहिजेत. अन्यथा आरोग्य सुविधेअभावी निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागतील.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.