वरणगावला विजतारा तुटल्याने बैलजोडी जागीच ठार

0

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   

कपाशीच्या शेतात सकाळी कोळपणीचे काम करीत असताना विद्युत खांबावरील तारा अचानक तुटून बैल जोडीच्या अंगावर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली, तर औत हकणारा विजेच्या स्पर्शाने दुर फेकला गेल्याने बालबाल बचावला आहे.  शेतीच्या कामाच्या दिवसांवर शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने तत्काळ विज कंपनीकडून मदतीची मागणी केली जात आहे.

बैलजोडीचा जागीच मृत्यू 

वरणगाव शहरातील रामपेठ भागातील बाळू सिताराम गव्हाळे यांच्या मालकीचे मुक्ताईनगर रोडकडील भागात असलेले शेत हे नाना माळी यांनी नफ्याने केले होते. त्यात कपाशी लागवड केली असुन कोळपणीसाठी रामपेठ भागातील ईश्वर देवचंद धनगर यांची रोजंदारीवर बैलजोडी शेतात घेऊन गेले होते. सकाळच्या सुमारास कोळपणीचे काम सुरु असतानाच शेतातील विज खांबावरच्या तारा अचानक तुटून बैलजोडीच्या अंगावर पडल्याने त्यांच्या जागीच मृत्यू झाला. तर शेतात निंदणी काम करणाऱ्या महिलांनी डोळ्यासमोरचे चित्र पाहून भाबावल्या असता सैरावैरा पळत सुटल्या. तर शेजारच्या शेतात असलेल्या शेतकऱ्यांनी तत्काळ ट्रान्सफारकडे धाव घेऊन विज पुरवठा बंद केला.

औत हाकणारा बालबाल बचावला 

कपाशीच्या शेतात कोळपणीसाठी बैलजोडी रोजंदारीवर काम करणारे ईश्वर धनगर व मुलगा सागर ईश्वर धनगर हे दोघे औत व बैलजोडी घेऊन शेतात गेले होते. मुलगा औत हाकत असताना अचानक खांबावरच्या विजेची तार तुटून बैलजोडी व लोखंडी औतावर पडल्याने सागरला विजेचा धक्का बसल्याने तो दूर फेकल्या गेला. मात्र त्याला काय झाले हे काहीच कळले नाही. तो उठून पुन्हा तडफडत असलेल्या बैलाच्या जवळ जाण्याच्या प्रयत्नात लोखंडी औताला स्पर्श होताच तो पुन्हा दुर फेकल्या गेल्याने त्यांच्या लक्षात आल्याने त्याने आपल्या वडिलाना जोरात हाक दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.