पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते वंदे भारत एक्सप्रेसचे लोकार्पण

0

 

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबई ते शिर्डी तसेच मुंबई ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचे लोकार्पण करण्यात आले.

मुंबईतील सीएसटी रेल्वे स्टेशनवर हा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला. प्लॅटफॉर्म क्रमांक 17 वरून मुंबई ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस निघाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर देशातील या नवव्या वंदे भारत एक्सप्रेसचं लोकार्पण करण्यात आलं. मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या प्रवाशांना तुळजापूर, अक्कलकोट या तीर्थक्षेत्रांवर ही ट्रेन थांबेल. त्यानंतर काही मिनिटांच्या अंतराने प्लॅटफॉर्म क्रमांक 18 वरून मुंबई ते शिर्डी या दहाव्या वंदे भारत एक्सप्रेसचं लोकार्पण करण्यात आलं.

सीएसटी स्टेशनवरून सोलापूर आणि शिर्डीकडे जाणाऱ्या दोन्ही वंदे भारत ट्रेन रवाना झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील जनतेला उद्देशून भाषण केलं. भाषणाची सुरुवात त्यांनी मराठीतून केली. ते म्हणाले, ‘रेल्वेच्या क्षेत्रात आज मोठी क्रांती होतेय. नववी आणि दहावी वंदे भारत ट्रेन समर्पित करताना मला अत्यंत आनंद होतोयआजचा दिवस महाराष्ट्रातील आधुनिक कनेक्टिव्हिटिच्या दृष्टीने खूप मोठा आहे. प्रथमच एकाच दिवशी दोन वंदे भारत ट्रेन सुरु झाल्या आहेत. मुंबई आणि पुणे या शहरांना आधात्मिक ठिकाणांना जोडेल. शेतकरी, विद्यार्थी, उद्योजक, पर्यटक, भाविकांसाठी या ट्रेन महत्त्वाच्या आहेत.

शिर्डीत साईबाबांचं दर्शन घ्यायचं असेल, नाशिकचं रामकुंड, त्र्यंबकेश्वर, पंचवटीचं दर्शन करणं वंदे भारत ट्रेनमुळे सोपं होईल. मुंबई सोलापूर वंदे भारत ट्रेनमुळे अक्कलकोटचे स्वामी समर्थ, आई तुळजाभवानीचं दर्शन सुलभ होणार आहे. वंदे भारत ट्रेन सह्याद्री पर्वतांतून जाईल, तेव्हा प्रवाशांना खूप आनंद मिळेल. नव्या वंदे भारत ट्रेनसाठी जनतेला शुभेच्छा देतो.

Leave A Reply

Your email address will not be published.