उद्धव ठाकरे गटाला हादरा : डॉ. निलम गोऱ्हे शिंदे गटात सामील

0

मुंबई – उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमरदारांसह बंड करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे गटातून गळती सुरुच झाली. त्यानंतर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे या देखील आता मुख्यमंत्री शिंदेच्या गटात सामील झाल्या आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना हा मोठा धक्का बसला असल्याचे मानले जात आहे.

विधानभवनात शिवसेना पक्ष कार्यालयात हा प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. ठाकरे गटात नाराजी वगैरे नसते. मी अंधारेंमुळे नाराज नाही, असे मत त्यांनी स्पष्ट केले. तर दुसरीकडे ‘नीलम गोऱ्हे यांचा प्रवेश ऐतिहासिक आहे..’ असे उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.

नीलम गोऱ्हे यांनी 1987 पासून सामाजिक कार्यास सुरुवात केली. सामाजिक कार्य करत असतानाच त्यांनी राजकारणात प्रवेश केला. नीलम गोऱ्हे यांनी काही काळ सामाजिक चळवळीत काम केल्यानंतर शिवसेनेत प्रवेश केला. गेल्या अनेक वर्षांपासून त्या विधान परिषदेवर शिवसेनेचं प्रतिनिधित्व करतात.

Leave A Reply

Your email address will not be published.