धक्कादायक घटना उघडकीस, टीटीई लॉबीमध्ये दारू पार्टी

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

पश्चिम रेल्वेवरील वांद्रे टर्मिनसमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चक्क टीटीई लॉबीमध्ये दारू पार्टी सुरु असलेलचे उघडकीस आले. ती टीसींना टीटीई वांद्रे टर्मिनसमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. समीर मकवाना(उपमुख्य तिकीट निरीक्षक), विनय देशमुख (मुख्य तिकीट निरीक्षक) आणि भावेश पटेल(मुख्य तिकीट निरीक्षक) अशी तिघांची नावे आहेत. तिघेही बडोदा विभागातील टीटीई आहेत. तिघांनाही निलंबित करण्यात आले आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तपासणीत हा प्रकार उघडकीस
पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ डीसीएम विनीत अभिषेक यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारल्यानंतर अभिषेक हे अॅक्शन मोडमध्ये आले. बुधवारी वांद्रे टर्मिनस येथे अचानक तपासणी करतांना अभिषेक हे टीटीई लॉबीमध्ये गेले. टीटीई लॉबीमध्ये बडोदा विभागातील तीन टीटीई दारू पित असल्याचे उघडकीस आले. तीन टीसी रेल्वेच्या आवारातच मद्यप्राशन करतांना रंगेहात पकडले गेले.

तिन्ही टीसींवर निलंबनाची कारवाई
बुधवारी दुपारी 2 ते 2.30 वाजण्याच्या सुमारास वांद्रे टर्मिनसच्या TTE लॉबीची पाहणी केली. यावेळी समीर मकवाना (उपमुख्य तिकीट निरीक्षक), विनय देशमुख (मुख्य तिकीट निरीक्षक) आणि भावेश पटेल (मुख्य तिकीट निरीक्षक) यांना रंगेहाथ पकडले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या तिन्ही टीसींवर निलंबनाची कारवाई केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.