रेल्‍वे प्रवाशांनो लक्ष द्या.. ८ रेल्‍वेगाड्या रद्द

वाचा संपूर्ण यादी

0

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क 

रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. तुम्ही देखील रेल्वेने प्रवास करणार असाल तर ही बातमी नक्की वाचा.  मध्‍य रेल्‍वेच्‍या भुसावळ विभागात ३० ऑगस्‍ट रोजी सायंकाळी ६ वाजेपासून ३१ ऑगस्‍ट रोजी दुपारी २ वाजेपर्यंत मूर्तिजापूर रेल्‍वे स्‍थानकानजीक लांब पल्‍ल्‍याच्‍या लूप मार्गासाठी वाहतूक आणि पॉवर ब्‍लॉक घेण्‍यात येणार आहे. त्‍यामुळे आठ रेल्‍वेगाड्या रद्द करण्‍यात आल्‍या आहेत. यापूर्वी १४ रेल्‍वेगाड्या रद्द करण्‍यात आल्‍याची माहिती रेल्‍वे प्रशासनाकडून देण्‍यात आली होती, त्‍यापैकी सहा रेल्‍वेगाड्या पूर्ववत धावणार आहेत.

 

पॉवर ब्‍लॉकमुळे ०११२७ लोकमान्‍य टिळक टर्मिनस-बल्‍लारशाह विशेष एक्‍स्‍प्रेस (२९ ऑगस्‍ट), ०११२८ बल्‍लारशाह- लोकमान्‍य टिळक टर्मिनस विशेष एक्‍स्‍प्रेस (३० ऑगस्‍ट), १११२१ भुसावळ-वर्धा एक्‍स्‍प्रेस (३० ऑगस्‍ट), १११२२ वर्धा-भुसावळ एक्‍स्‍प्रेस (३१ ऑगस्‍ट), २२११७ पुणे-अमरावती एसी एक्‍स्‍प्रेस (३० ऑगस्‍ट), अमरावती-पुणे एसी एक्‍स्‍प्रेस (३१ ऑगस्‍ट), ०१३६५ भुसावळ-बडनेरा विशेष पॅसेंजर (३१ ऑगस्‍ट) आणि बडनेरा-भुसावळ (३१ ऑगस्‍ट) या रेल्‍वेगाड्या रद्द करण्‍यात आल्‍या आहेत.

यापूर्वी रद्द घोषित करण्‍यात आलेल्‍या सहा रेल्‍वेगाड्या पूर्ववत धावणार आहेत, त्‍यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-अमरावती एक्‍स्‍प्रेस (३० ऑगस्‍ट), अमरावती-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्‍स्‍प्रेस (३० ऑगस्‍ट), १२१३६ नागपूर-पुणे एक्‍स्‍प्रेस (३० ऑगस्‍ट), पुणे-नागपूर एक्‍स्‍प्रेस (३१ ऑगस्‍ट), १७६४१ काचिगुडा-नरखेड एक्‍स्‍प्रेस (३० ऑगस्‍ट) आणि १७६४२ नरखेड-काचिगुडा एक्‍स्‍प्रेसचा (३० ऑगस्‍ट) समावेश आहे. काचिगुडा-नरखेड एक्‍स्‍प्रेस अकोलापर्यंत धावणार आहे, तर नरखेड-काचिगुडा एक्‍स्‍प्रेस अकोला येथून सुटणार आहे, अशी माहिती मध्‍य रेल्‍वेच्‍या भुसावळ विभागाकडून देण्‍यात आली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.