ऐन सणासुदीच्या तोंडावर २२ रेल्वे गाड्या रद्द

0

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सध्या सणासुदीचे दिवस असल्याने जर तुम्ही रेल्वेने प्रवास करणार असाल तर ही बातमी नक्की वाचा, जेणेकरून ऐनवेळेवर तुम्हाला अडचणी येणार नाहीत.

नागपूर विभागाने ८ ते १३ ऑगस्ट दरम्यान २२ रेल्वेगाड्या रद्द केल्या. स्टील साइडिंगच्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात आला आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमध्ये नागपूर विभागाचे स्टील साइडिंग चालू करण्यासाठी स्टेशनच्या पॅनलचे यार्ड संशोधन आणि बदल रद्द करण्यासाठी रेल्वेने ब्लाॅक घेतला. परिणामी भुसावळ विभागातून धावणाऱ्या तब्बल २२ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. नागपूर विभागात नाॅन इंटरलाॅकिंगचे काम रेल्वे प्रशासनाकडून हाती घेण्यात आले आहे. परिणामी या कामामुळे ८ ऑगस्टपासून रेल्वे प्रशासनाने हा ब्लाॅक घेतला. भुसावळ विभागातून धावणाऱ्या २२ गाड्या रद्द केल्या आहेत.

या २२ गाड्या झाल्या रद्द

१८०३० शालिमार-लोकमान्य टिळक टमिर्नस १८०२९ लोकमान्य टिळक टर्मिनस ते शालिमार (८ ते १२ ऑगस्टपर्यंत रद्द), २२८४६ हटिया- पुणे (८ ते १२ ऑगस्ट) तर (१० ते १४ ऑगस्ट), १३४२५ मालदा टाउन- सुरत (६ ते १३ ऑगस्ट), १३४२६ सुरत- मालदा टाउन (८ ते १५ ऑगस्टपर्यंत), २२५८९४ हावडा-शिर्डी साईनगर (११ ऑगस्ट), २२८९३ शिर्डी साईनगर-हावडा (१३ ऑगस्ट), २२९०५ ओखा- शालिमार (७ ऑगस्ट), २२९०६ शालिमार- ओखा एक्स्प्रेस (९ ऑगस्ट), १२८१२ हटिया-एलटीटी (१२ व १३ ऑगस्ट), १२८११ एलटीटी-हटिया (१४ व १५ ऑगस्ट), १२९०५ पोरबंदर-शालिमार (१० व ११ ऑगस्ट), १२९०६ शालिमार पोरबंदर (१२ व १३ ऑगस्ट), १२८१० हावडा-सीएसएमटी (८ ते १३ ऑगस्ट), १२८०९ मुंबई-हावडा (८ ते १३ ऑगस्ट), १२८३४ हावडा- अहमदाबाद (८ ते १३ ऑगस्ट), १२८३३ अहमदाबाद-हावडा (८ ते १३ ऑगस्ट), हावडा- पुणे व हावडा पुणे या गाड्या (८ ते १३ ऑगस्ट), १२१०१ एलटीटी-शालिमार (७ व ९ ऑगस्ट), १२१०२ शालिमार-एलटीटी ही गाडी (८, १० व ११ ऑगस्ट) रोजी रद्द आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.