खळबळजनक; पुण्यात माजी नगरसेविकेवर अत्याचार

फोटो, व्हिडिओ वायरल करण्याची धमकी देत १० लाखांची मागणी

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क

पुण्यातील एका माजी नगरसेविकेला ब्लॅकमेल करून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विद्येचं महेर घर तसेच महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अशी वेगळी ओळख असलेल्या पुण्यामध्ये चक्क एका माजी नगरसेविकेबरोबर असाच एक धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. जुने फोटो दाखवून नगरसेविका राहिलेल्या महिलेवर बलात्कार झाल्याने शहरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे.

आरोपीवर गुन्हा दाखल
सूत्रांनुसार, मैत्रीपूर्ण संबंधांमधून पीडित नगरसेविकेबरोबर काढलेले फोटो दाखवून बदनामी करण्यात येईल अशी धमकी देण्यात आली. या महिलेवर बलात्कार झाल्याची तक्रार पर्वती पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दाखल झालेल्या गुन्ह्यातील तपशीलामध्ये आरोपीचं नाव सचिन असं असल्याचं म्हंटले जात आहे. संबंधित आरोपीला अटक करण्यात आली आहे.

मागील 6 वर्षांपासून सुरु होता हा प्रकार
सचिनने या महिलेला हे फोटो आणि व्हिडीओ तुझ्या पतीला दाखवेल आणि तुझा संसार उद्धवस्त करेल, अशी धमकीही दिली. या महिलेला बदनामी करण्याची धमकी देत, तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. तब्बल 2017 पासून हा संपूर्ण प्रकार सुरु होता, असं या पीडित महिलेचं म्हणणं आहे. याच कालावधीमध्ये आरोपीने संबंधित महिलेला धमकावून तिच्याकडून तब्बल 10 लाख रुपये घेतल्याचंही तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलं आहे. यासोबतच लैंगिक छळाबरोबरच, खंडणी आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीला न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे. या आरोपीने पैशांचं काय केलं, या कटामध्ये इतर कोणी सहभागी होतं का? त्याने हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणाला पाठवले आहेत का? यासंदर्भातील तपास पोलीस करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.