Tokyo Olympics 2020 : रवी कुमारची फायनलमध्ये धडक; आणखी एक पदक निश्चित

0

टोकयो 

टोकयो ऑलिम्पिकमध्ये भारताला कुस्तीमध्ये मोठी आशा आहे. पुरुषांच्या 57 किलो वजनी गटाच्या कुस्तीमध्ये भारताच्या रविकुमार दहीयाची लढत कझाकस्तानच्या नूरइस्लाम सानायेवशी  होती. या मॅचमध्ये रवी कुमार विजयी झाला आहे. भारताकडून यापूर्वी सुशील कुमारनं ऑलिम्पिक फायनलमध्ये धडक मारली होती. त्याची बरोबरी करण्यात रवी कुमारने केली आहे. रवी कुमारनं मॅचच्या सुरुवातीला 2-1 अशी निसटती आघाडी घेतली होती. त्यानंतर सनायेवनं जोरदार खेळ करत रवीवर 9-2 ने आघाडी घेतली. त्यानंततर सनायाला फिटनेसची समस्या जाणवली. त्यामुळे रवीनं ही आघाडी 5-9 ने कमी केली.

रवीनं त्यानंतर जोरदार खेळ करत 7-9 नं ही आघाडी कमी केली. रवी कुमारनं त्यानंतर ही आघाडी कायम ठेवत विजय मिळवला. भारताच्या रविकुमार दहियाने कोलंबियाच्या ऑस्कर टिग्रेरसचा पराभव करत सेमीफायनल गाठली होती. रविकुमारनं 57 किलो वजनी गटात हे यश संपादन केलं आहे.

त्याने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळी केली, दहा गुणांच्या आघाडीमुळे रविकुमारनं वेळ संपण्यापूर्वीच या कुस्ती सामन्यात विजय मिळवला होता. रवी हरयणाच्या सोनिपत जिल्ह्यातला आहे. या देशाला कुस्तीची नर्सरी समजलो जाते. स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये अनेक दिग्गज कुस्तीपटू तयार झाले आहेत.

रवी कुमार नाहरी या गावचा असून त्याने वयाच्या 6 व्या वर्षीच कुस्ती . त्याने गावात सुरुवातीला कुस्ती खेळण्यास सुरुवात केली. वयाच्या 10 व्या वर्षापासून कुस्तीचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. 2019 मधील कुस्ती स्पर्धेत रवीनं ब्रॉन्झ मेडल जिंकले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.