मसाकातील वृक्षतोडीची चौकशी व्हावी

0

लोकशाही न्युज नेटवर्क
यावल ( प्रतिनिधी ) जिल्ह्यात साखर उत्पादनात आघाडीवर असलेला व तालुक्यातील उस उत्पादक शेतकऱ्यांची आत्मा असलेल्या मधुकर सहकारी साखर कारखाना बंद झाल्यापासुन तालुक्यातील उस उत्पादक शेतकऱ्यांची दयनिय अवस्था झाली असुन, जिल्हा बॅंकेने कर्जवसुली साठी विक्री केलेल्या कारखान्याच्या आवारातुन स्वच्छतेच्या नांवाखाली पन्नास वर्षापुर्वी मोठया प्रमाणात लावण्यात आलेल्या जिवंत वृक्षाची खुलेआम तोड करण्यात येत आहे .
जिल्हा बँकेच्या वतीने कर्जवसुलीसाठी खाजगीत विकण्यात आलेल्या न्हावी तालुका यावल येथील मधुकर सहकारी साखर कारखाना विक्रीस काढल्यापासुन विविध प्रकारे गोंधळ निर्माण झाले असुन, यात खाजगी कंपनीने कारखाना आवारातील मागील पन्नास वर्षापुर्वीची बहुमुल्य अशी लावण्यात आलेली वृक्षाची परिसर स्वच्छ करण्याच्या नांवाखाली मोठया प्रमाणावर व्यवस्थापकाकडुन बेकायद्याशीर कुठलीही परवानगी न घेता बेशुमार वृक्षाची तोड करण्यात आली असुन, खाजगी व्यवस्थापकाच्या माध्यमातुन पर्यावरणाचे समतोल बिघडेल असे घातककृत करण्यात आले असुन , या सर्व प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्यात यावी व संबधीतांवर कायद्याशीर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व उस उत्पादक शेतकरी राकेश वसंत फेगडे यांनी केली आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.