यावल येथे भरड धान्य खरेदी केंद्राची सुरूवात

0

लोकशाही न्युज नेटवर्क
यावल – केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत तालुक्यातील शेतकऱ्यांचे उत्पादीत भरडधान्य मका, ज्वारी खरेदी केंद्राचे यावलचे तहसीलदार महेश पवार यांच्या हस्ते येथील सातोद रोडवरील शासकीय गोदामात काटा पूजन करून करण्यात आले.
केंन्द्रात ज्वारी विक्री साठी प्रथम आलेले कोरपावलीचे शेतकरी तुषार सुदाम नेहते यांचा तहसीलदार महेश पवार यांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ देऊन गौरव करण्यात आले. शासकीय भरडधान्य खरेदी साठी तालुक्यातील असलेल्या कोरपावली वि.का.संस्थेकडे यंदा ५३९ शेतकऱ्यांच्या १७ हजार ४५८ क्विंटल ज्वारीची नोंदणी केली असून, मका खरेदी साठी ७० शेतकऱ्यांनी मका खरेदी साठी नोंदणी केली आहे. येथील खरेदी केंद्रात या वर्षी शासनाने ज्वारीसाठी २४ हजार ७०२ क्विंटलचे तर मका खरेदीसाठी ८ हजार ४०० क्विंटल चे उद्दिष्ट दिले असल्याची माहीती सोसायटीचे चेअरमन राकेश फेगडे यांनी पत्रकारांना दिली। त्या तुलनेत शेतकऱ्यांनी कमी नोंदणी केल्याने उद्दिष्ट गाठल्या जाणार नाही पण जर शासनाने धान्य खरेदीस मुदतवाढ केल्यास, उद्दिष्ट पूर्ण होण्यास मदत होईल.भरड धान्यास शासकीय हमीभाव ज्वारी २ हजार ९७०, तर मका १हजार ९६२ तर बाजरी २ हजार ३५० रुपये असून, याच धान्याचे खुल्या बाजारात हजार ४००-५०० रुपयांनी फरक दिसुन येत आहे.
या येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमास विविध कार्यकारी संस्था कोरपावली सचिव मुकुंदा तायडे, शेतकरी व या संस्थेचे चेअरमन राकेश फेगडे, विकाचे संचालक वसंत नामदेव महाजन, वसंत भोसले, शेतकरी डॉ. निलेश गडे , शासकीय गोदाम किपर सुकलाल कोळी यांच्यासह परिसरातील शेतकरी वर्ग उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.