लोकशाही न्युज नेटवर्क
कु-हाकाकोडा – इच्छापुर ता मुक्ताईनगर येथील शालिग्राम बेलदर यांनी राजकीय सूड भावनेने गेल्या दोन चार महिने आधी त्यानेच निकृष्ट बांधकाम केलेला ढापा दादागिरीने तोडून गेल्या दोन महिन्या पासून रस्ता बंद करून ठेवला आहे. पण माणुसकीच्या नात्याने व गावात तणाव नको या उद्देशाने ग्रामपंचायत ने त्याचे वर कार्यवाही केली नाही. तसेच त्या वार्डातील लोकांच्या येण्या जाण्याच्या समस्या लक्षात घेता तो ढापा नव्याने बनवण्याचे ठरवले.
परंतु सदर इसमावर त्या वेळेस कायदेशीर कार्यवाही न झाल्याने त्याची दादागिरी वाढली. व तो वारंवार दारू पिऊन सरपंच व सदस्यना यांना शिवीगाळ व धमक्या देत असतो.23 रोजी त्याने सरपंच यांना ढाप्या बद्दल फोन करून विचारणा केली त्याला प्रेमाने सांगितले आम्ही काम मंजूर केलेय इस्टीमेट तयार झाले की काम करतो. त्याने सूड व बदनामी करण्याच्या भावनेने परत 26/12/22 तारखेला कॉल करून धमकी देऊन सरपंच यांना गावाचे रस्ते खोदून बंद करण्याची धमकी देऊन कॉल कट केला, परत कॉल करून तीच भाषा वापरून मुद्दाम वाद वाढवून कॉल रोकॉर्ड करून. त्याची एक क्लिप बनवून सोशल मीडियार गेल्या 29/12/22 व्हायरल केली.
त्यामुळे त्याच्यावर ग्रामपंचायत चे नुकसान केले प्रकरणी व सरपंच याची सोशल मीडियावर बदनामी केल्या प्रकारणी भारतीय दंड विधान ४२७ ,५०४,५०६, व ५१० प्रमाणेगुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास करीत आहे
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Next Post