बस मध्ये चढताना चोरी करणाऱ्या चोरट्यास अटक

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
चाळीसगाव – तालुक्यातील वरखेडे बु येथील 69 वर्षीय वृद्ध महिला चाळीसगाव बस आगारात बसमध्ये चढत असताना अंबरनाथ (ठाणे) येथील आरोपीने त्यांच्या हातातील 60 हजार रुपये किमतीची 15 ग्रॅम सोन्याची बांगडी कटरने कापून पलायन करत असताना दि 9 रोजी दुपारी 12-15 वाजेच्या सुमारास प्रवाशांच्या मदतीने आरोपी कुणाल सुनील गायकवाड 28 रा. चंद्रा बाई चाळ वडारपाडा फातिमा चर्च जवळ अंबरनाथ पश्चिम जि ठाणे यास पो कॉ दीपक चौधरी यास ताब्यात घेतले असून वृद्धेच्या फिर्यादीवरून त्याच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला असून त्याचेकडून सोन्याची बांगडी हस्तगत करण्यात आली आहे.
पोलीस स्टेशनला आणले असता पो. नि. के. के. पाटील, सपोनि दिपक बिरारी, सागर ढिकले, उपनिरीक्षक सुहास आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली डी. बी. चे हवालदार राहुल सोनवणे, पो कॉ विनोद खैरनार, विजय पाटील, प्रवीण जाधव, रवींद्र बछे आदी पथकाने त्यास पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून सोन्याची बांगडी काढून दिली आहे.
आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पो नि के के पाटील यांनी वर्तवली आहे. कोल्हापूर, रत्नागिरी, मुंबई रेल्वे, सांगली, नंदुरबार जिल्ह्यात गुन्हे केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.