प्रत्येकाने आपल्या समाजातील स्वतंत्र सैनिकांचा शोध घेऊन त्यांचा सन्मान करा

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

आपण जो ७५ वा भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत, त्यात अनेक स्वातंत्र्य सैनिकांचे मोठे योगदान आहे. असे अनेक स्वातंत्र्य सैनिक आहेत ते आपल्याला माहित नाही. त्या स्वातंत्र्यसैनिकांचा शोध घेऊन प्रा. श्रीकृष्ण सोमवंशी आणि त्यांच्या पत्नी प्रा. डॉ. राधिका सोमवंशी यांनी ‘कथा क्षत्रिय शौर्याच्या’ या पुस्तकातून त्यांचा गैरव केला आहे. या पुस्तकाचा आदर्श डोळ्यापुढे ठेऊन प्रत्येकाने आपल्या समाजातील स्वातंत्र्यसैनिकांचा शोध घेऊन त्यांना सन्मानित केले पाहिजे, असे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. के. बी. पाटील यांनी केले.

लेखक प्रा. श्रीकृष्ण विष्णू सोमवंशी यांनी लिहिलेल्या ‘कथा क्षत्रिय शौर्याच्या’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवार, २४ रोजी सकाळी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात उत्साहात पार पडले. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून डॉ. के. बी. पाटील बोलत होते.

याप्रसंगी मंचावर ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक बाबुराव पिंपळे (बीड), माजी शिक्षणाधिकारी नीळकंठ गायकवाड, सोमवंशी आर्य क्षत्रिय समाज प्रादेशिक अध्यक्ष श्यामराव चव्हाण, अध्यक्ष श्यामसुंदर छत्रबंद, अ. भा. सोमवंशी आर्य क्षत्रिय समाज अध्यक्ष प्रमोद बागलाणे, अखिल भारतीय गाडीलोहार खान्देश विभाग अध्यक्ष रमेश भागवत, डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, प्रा. श्रीकृष्ण सोमवंशी, प्रा. डॉ. राधिका सोमवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भारतमातेचे प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर स्नेहल वाणी यांनी गणेश वंदना सादर केली, तर सांघिक गीत श्याम चव्हाण यांनी सादर केले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान केलेल्या परंतु दुर्लक्षित राहिलेल्या सोमवंशी आर्य क्षत्रिय समाजातील स्वातंत्र्य सैनिकांची प्रेरणादायी गाथा या पुस्तकात मांडण्यात आली आहे. पूर्ण भारतातले आर्य क्षत्रिय समाजातील लुप्त होण्याच्या मार्गावर असलेले ३१ स्वातंत्र्य सैनिकांची माहिती या पुस्तकात आहे. यातील आज बाबुराव पिंपळे आणि उद्धवराव पिंपळे (दोन्ही रा. टाकळगाव, ता. गेवराई, जि.बीड) हयातीत आहे. पुस्तकात समाजातील ज्या २० कलाकारांनी रेखाचित्र रेखाटले आहेत. यामध्ये कला महर्षी असणारे कलाकारांचा समावेश आहे.

प्रास्ताविक प्रा. श्रीकृष्ण सोमवंशी आणि पत्नी प्रा. डॉ. राधिका सोमवंशी यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी पुस्तक तयार करण्याविषयीची कल्पना, अडचणी याबाबत त्यांनी विविध बाबींचा आवर्जून उल्लेख केला. ते म्हणाले, शहादा येथे झालेल्या मेळाव्यात स्वतंत्र सैनिकांचा सत्कार केला. त्यावेळी असे दिसून आले की अनेक स्वतंत्र सैनिक शासनाच्या सोयी – सुविधा, योजनांपासून वंचित आहे. अशा लोकांचा शोध घेवून त्यांची माहिती गोळा करून त्यांचा गौरव करण्याचे ठरवले. कोरोना काळाचा सदुपयोग करून या पुस्तकाची निर्मिती झाली. स्वतंत्र सैनिकांची माहिती तजशी मिळते असल्याचा आनंद वेगळाच असतो. कोरोना काळाचा उपयोग करून हे पुस्तक तयार झाले. पुस्तक निर्मितीमध्ये अनेकांचे सहकार्य मिळाले आहे, असे सांगून त्यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि उपस्थित स्वातंत्र्य सैनिक पिंपळे यांनी परिचय करून दिला.

अ.भा.समाज अध्यक्ष प्रमोद बागलाणे म्हणाले की, समाजाविषयी आदर आणखी वाढण्यासाठी अधिकाधिक स्वातंत्र्य सैनिकांचा शोध घेतला गेला पाहिजे, त्यामुळे समाजाची अखंडता राहील, असेही ते म्हणाले.

यावेळी उपस्थित ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक बाबुराव पिंपळे यांचा सत्कार श्रीफळ, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांनी केला. त्याचप्रमाणे स्वातंत्र्य सैनिक धोंडिबा तुळशीराम चव्हाण यांचे पुत्र श्रावण चव्हाण (औरंगाबाद), स्वातंत्र्य सैनिक चंद्रकांत शंकरराव चव्हाण (पुणे) यांचे पुत्र किरण चव्हाण आणि स्वातंत्र्य सैनिक विष्णू चिंधू सोमवंशी (नंदुरबार) यांचे नातू महेंद्र वसंत सोमवंशी यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार झाला. तसेच चित्रकार प्रा. गोपाळ डोंगे, सोलापूर, शुभम मानेकर, पुणे, निखील बोरसे, जळगाव, आदर्श संघपाल, नंदुरबार, तुषार वानखेडे, जळगाव,रोहित सोमवंशी, शहादा यांचासुद्धा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

सर्व समाज एकत्र येऊन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करावा

अध्यक्षीय मनोगतात माजी कुलगुरु डॉ. के. बी. पाटील म्हणाले की, सोमवंशी दाम्पत्य कोणतीही गोष्ट सहजपणे साध्य करू शकते. ज्या समाजातून ते आले त्या समाजाची पाहिजे तशी दखल घेतली गेली नाही. एकएक स्वतंत्र सैनिकांचा माहिती गोळा कण्यासाठी त्यांची खूप मेहनत घेतल्याचे दिसून येते. स्वातंत्रपूर्व काळात लोहार समाजाने खूप मोठे काम केले आहे. स्वतंत्र सैनिकांना शास्त्र बनवून ते त्यांना पुरविणे म्हणजे खूप शौर्याचे काम आहे. सोमवंशी यांनी दोन – अडीच वर्ष पुस्तकासाठी खूप धावपळ केली. तसेच पुस्तकातून स्वतंत्र सैनिकांच्या पत्नीचा उल्लेख करून त्यांनी एकप्रकारे त्यांचा गैरव केला आहे.हे पुस्तक संग्रही ठेवण्यासारखे आहे. प्रत्येक समाजातील प्रत्येकाने आपल्या समाजातील स्वतंत्र सैनिकांना शोध घेणे आवश्यक आहे. कारण जे स्वतंत्र आपण बघतो आहे ते स्वतंत्र सैनिकांमुळेच. हे स्वतंत्र ठिकवून ठेवच्याची आपली जबाबदारी असून सर्व समाज एकत्र येऊन हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करावा, असे आवाहन करून डॉ. के. बी. पाटील यांनी सोमवंशी यांना शुभेच्छा दिल्या.

यांची होती उपस्थिती

यावेळी सुरेश भागवत (धरणगाव), रवींद्र भागवत, डॉ. व्ही. बी, शहा, डॉ. एस. वाय. पाटील, यजुर्वेंद्र महाजन, एन. डी. चौधरी, भारतीताई इंगळे, सुजाता देशपांडे, गोपाळ पाटील, जिल्हा सांकेतिक अधिकारी राजेंद्र बोरसे, नितीन पाटोळे, सुभाष जगताप (शेंदुर्णी), डॉ. अरुण पाटील, जे. टी. अत्तरदे, नंदुरबार येथील रामेश्वर संकपाळ, बापू इंगळे, गजानन इंगळे, राजेंद्र बोरसे आदी उपस्थित होते.

सूत्रसंचालन प्रा. डॉ. डी. यु. राठोड आणि प्रा. उमेश इंगळे यांनी केले. आभार प्रा.डॉ.राधिका सोमवंशी यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.