पारोळ्यात भरला गुरांचा बाजार

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
पारोळा बाजारात विक्री व खरेदीदारांची गर्दी, लप्पी आजारांमुळे बंद होता गुरांचा बाजार राज्यात गुरांवरील लम्पी आजाराचा वाढता प्रादुर्भाव पाहता गुरांचा बाजार पारोळा कृषी उत्पन्न बाजार समिती ने बंद केला होता. आता गुरांवरील लप्पी आजार भरपुर प्रमाणात कमी झाल्याने अटी-शर्तीच्या आधीन राहून बाजार सुरू करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्याने त्या अनुषंगाने दि.८ जानेवारीपासून पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीत गुराचा
बाजार भरल्याने गुराची खरेदी- विक्री सुरु झाली. त्या मुळे बाजार समिती मध्ये गर्दी दिसुन यात बर्या पैकी गुरांची खरेदी विक्री झाली असल्याची माहिती मिळाली.
आली लम्पी आजारामुळे गुरांचा बाजार भरत नसल्याने बाजार समितीचे उत्पन्न ही घटले होते आता गुरांचा बाजार सुरु झाल्याने बाजार समितीच्या उत्पानात देखील वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे. तरी खबरदारी चा उपाय म्हणून शेतकर्यांना वेळोवेळी लंपी ग्रस्त गुरें बाजारात आणु नये म्हणून सुचना देण्यात येत होत्या तसेच बाजारात कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी लक्ष देऊन आहेत यात कुठेही शंका वाटल्यास ते त्यांना सुचना देत असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव रमेश चौधरी यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.