लोकशाही न्युज नेटवर्क
मनवेल ता.यावल – गेल्या दोन-तीन दिवसांपासून साकळीसह परिसरात मोठ्या प्रमाणात थंडीचा कडाका वाढलेला असून संपूर्ण परिसर गारठला आहे तर शेतशिवारांमध्ये अति थंडीमुळे धुके पसरलेले असून सर्वत्र आभाळी वातावरण निर्माण झालेले आहे.या थंडीमुळे परिसरातील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालेले असून दिवसाही लोक शेकोट्या पेटवित असून थंडीपासून संरक्षण करीत आहे.या थंडीच्या काळात रात्रीचे तापमान खूप मोठ्या प्रमाणात घसरत असल्याने गावातील रस्ते निर्मनुष्य होत आहे.
गेल्या दोन-तीन दिवसापासून पडत असलेल्या अति थंडीमुळे गहू, हरबरा या रब्बी पिकांना फायदा होईल तर परिसरातील केळी पिकाला मोठ्या प्रमाणात धोका होणार आहे.निसवणीला आलेल्या केळीबागांचे तर मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे.थंडीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहे. आजारांचे प्रमाण वाढणार आहे.थंडीपासून बचाव करण्यासाठी रात्रीही शेकोट्या पेटविल्या जात आहे.थंडीचा वाढता जोर पाहता केळी बागातदार शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.