- Advertisement -
लोकशाही न्यूज नेटवर्क
दहिगाव ता. यावल – तालुक्यातील सातोद कोरपावली रस्त्याच्या कामाचे चौकशी व्हावी अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर करीत आहे गेल्या अनेक वर्षापासून सातव द कोरपावली रस्ता हा शेती रस्त्यासारखा झालेला होता दरम्यानच्या दोन वर्षात या रस्त्यावर तुकडे पद्धतीने डांबरीकरण करण्यात आले नुकताच एक ते दीड किलोमीटर अंतराचे सध्या काम सुरू आहे या कामात खडी मातीमध्ये दाबली जात आहे त्यामुळे खडीवर रोलिंग मशीन अत्यंत कमी प्रमाणात फिरवले जात आहे लवकरच हा रस्ता उचलून पूर्ववत होईल असे चित्र दिसत आहे यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ या कामाची चौकशी करावी अशी मागणी होत आहे