एप्रिल मधेच तापमान ४२ अंश, दोन दिवसात पारा ६ अंशाने वाढला

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

दोन दिवसांपासून जळगाव शहरात तापमानाचा पारा वाढल्याचे जाणवत आहे. जळगाव जिल्हा तापमानाच्‍या बाबतीत हॉट समजला जातो. दरवर्षी मे (May) महिन्‍यात ४५ ते ४८ अंशापर्यंत येथील तापमान जाते. यंदा मात्र एप्रिल (April) महिन्यातच (Temperature) तापमानाने ४२ अंशापर्यंत मजल मारली आहे. मागील दोन दिवसात पारा ६ अंशाने वाढला असल्‍याने (Jalgaon) जळगाव सर्वात ‘हॉट’ बनले आहे.

दोन दिवसांपुर्वी पर्यंत गारवा वाटत होता. मात्र मागील दोन दिवसांपासून तापनात अचानक वाढ झाली असून सकाळी दहा वाजल्‍यापासूनच उष्‍णतेच्‍या झळा जाणवत आहेत. यामुळे जळगावचा पारा आता ४२ अंशावर पोहचला आहे.मार्चच्‍या शेवटच्‍या आठवड्यापासून वाढत असलेले तापमान यंदा एप्रीलच्‍या मध्‍यापर्यंत अवकाळी पाऊस व हवामान बदलामुळे कमीच राहिले होते.

तापमानाची चाळीशी पार
ममुराबाद तापमान केंद्रावर ४१.६ अंश तापमानाची नोंद झाली. किमान तापमान २६.८ अंश होते, तर तापमान अभ्यासक नीलेश गोरे यांच्या ‘वेलनेस’ने जळगावचे तापमान ४२ अंश नोंदले. एकंदरीत जळगाव जिल्‍ह्यातील सर्वच शहरातील तापमान हे चाळीशी पार गेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.