लोकशाही, न्यूज नेटवर्क
बीबीसी या वृत्त वाहिनीच्या अडचणी संपायचे नाव घेत नाही आहे. बऱ्याच दिवसांपूर्वी ईडी ने छापे टाकले असून सर्वच कर्मचाऱ्यांची कसून तपासणी देखील केल्याचे सर्वांनाच माहित आहे. पुन्हा आता बीबीसीच्या अडचणीत वाढ झाली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) बीबीसी इंडियाविरोधात (BBC INDIA) गुन्हा दाखल केला आहे. परकीय चलनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून ब्रिटिश वृत्त समूहाशी संबंधित संस्थेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईडीच्या अधिकार्यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे.