ऑफिसला जाताना ‘चहा’ घेताय, तर वाचा हा किळसवाणा प्रकार

0

लोकशाही, न्यूज नेटवर्क

 

दिवसाची सुरुवात व्यक्ती एक कप चहाने करतो. चहाची तुलना अमृताशी केली जाते. चहा घरी प्यायला मिळाला नाही तर अनेक व्यक्ती ऑफिसला निघताना बाहेर टपरीवर चहाचा घोट घेतात. कामात कंटाळा आणि आळस आल्यावर देखील व्यक्ती चहा पितात. अशात अनेकांसाठी प्रिय असलेल्या या चहा संबंधी एक भयंकर प्रकार समोर आला आहे.

 

चहा विक्रेत्याचा व्हिडिओ आला समोर

सध्या सोशल मीडियावर चहा (Tea) विक्रेत्याचा एक अतिशय किळसवाणा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये या व्यक्तीने चहाच्या कपात लघवी केली. त्यानंतर तो कप त्याने थेट चहा देण्यासाठी वापरला. चहा पिण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीने चहा मागितल्यावर त्याने लगेचच त्या कपातून सदर व्यक्तीला चहा दिला आहे. या संतापजनक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून नागरिकांनी कारवाईची मागणी केली आहे.

सदर व्यक्ती चहाच्या दुकानावर असताना त्याला लघवीसाठी जायचे होते. मात्र दुकान संभाळण्यासाठी तेथे कोणीही नसल्याने या व्यक्तीने थेट कप घेतला आणि त्यामध्ये लघवी केली. तसेच काही माध्यमांवर या घटनेविषयी असे म्हटले आहे की, चहा पिण्यासाठी व्यक्ती आला तेव्हा दुकानदाराकडे स्वच्छ कप नव्हते. हे कप साफ करण्यासाठी पाण्याची गरज होती. मात्र तिथे पाणीही नसल्याने या व्यक्तीने कपात लघवी केली. त्यानंतर लघवीनेच तो कप धुवून घेतला. ही घटना नेमकी कुठली आहे हे अद्याप समजू शकले नाही. एका इंस्टाग्राम अकाउंटवर (Instagram account) हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर मोठा संताप व्यक्त केला आहे.

https://www.instagram.com/reel/CqszjsZAufV/?igshid=ZTE2MDY0MWU=

Leave A Reply

Your email address will not be published.