‘पुष्पा २’ साठी अल्लू अर्जुनने घेतले ८५ कोटी

0

लोकशाही, न्यूज नेटवर्क

 

दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) सध्या ‘पुष्पा २’ (Pushpa 2) या सिनेमामुळे चर्चेत आहे. नुकताच या सिनेमाच ‘टीझर आऊट झाला आहे. त्यातून पुष्पाचा नवा लूकही प्रेक्षकांच्या समोर आला. या सिनेमासाठी अल्लू अर्जुनने ४५ कोटी रुपये आकारले होते. आता या सिनेमाचा पुढचा भाग अर्थात ‘पुष्पाद रुल’ (Pushpad Rul) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमासाठी अल्लू अर्जुनने ८५ कोटी मानधन घेतल असल्याची चर्चा आहे. ‘पुष्पा’ सिनेमाप्रमाणे ‘पुष्पा २’मध्येही अल्लू अर्जुनसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तसंच मीडिया रिपोर्टनुसार, ‘पुष्पा द रुल’ या सिनेमात साई पल्लवीची (Sai Pallavi) एन्ट्री होऊ शकते असं म्हटलं जात आहे. ‘पुष्पा द राइज’ हा सिनेमा आंध्र व तेलंगनामधील बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात कमी पडला होता. पण जागतिक पातळीवर हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर जगभरातील बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगलीच कमाई केली आहे. अल्पावधीतच या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. आता सगळ्यांचं लक्ष ‘पुष्पा पार्ट २’ कडे लागलं आहे. हा सिनेमा हिट होतो की फ्लॉप हे लवकरच कळेल.

Leave A Reply

Your email address will not be published.