कजगाव बस स्टँड परिसरातील अतिक्रमण त्वरित काढा अन्यथा भडगाव तहसिल समोर आत्मदहन

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

तालुक्यांतील कजगाव येथिल सरकारी गावठाण गट नं. 131/2 मधील बस स्टैंड आवारातील, समोरील बेकायदेशीर अतिक्रमण, टपऱ्यांचे अतिक्रमण त्वरित काढावे अन्यथा भडगाव तहसिल कार्यालय समोर आत्मदहन करण्याचा लेखी इशारा जीवन प्रभाकर चव्हाण यांनी तहसीलदार यांना दिला आहे. तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मौजे कजगाव येथिल सरकारी गावठाण गट नं. 131/2 हद्दीतील बसस्टँड ला दिलेल्या जागेत अनेक ग्रामस्थांनी त्या जागेवर लोटगाड्या / हातगाड्या लावल्या आहेत व काहींनी पक्के बांधकाम केलेले आहे. तसेच अनधिकृत पणे टपऱ्या ठेऊन भाजीपाला दुकाने, सोडा दुकान, फळविक्री, व इतर अवैध धंदे त्या जागेत केले जातात.

सदर लोटगाड्या व हातगाड्या यांचे अतिक्रमण दि. 27/09/2022 रोजी ग्रामपंचायत कजगांव यांचे मार्फत अतिक्रमण काढण्याची कारवाई झालेली आहे. त्यानंतर एस.टी महामंडळ ची बस ही त्या जागेत खाली येऊन थांबत होती. व तिथे महामंडळ चा एक कर्मचारी देखील नियुक्त करण्यात आला आहे व तो आजपर्यंत कार्यरत आहे. लोकांनी तिथे पुन्हा अतिक्रमण करून टपऱ्या ठेवल्या आहेत. त्यामुळे बस खाली उतरविण्यासाठी अडथळा येत आहे. त्यामुळे मूळ चांदवड-जळगांव महामार्गावर बस उभी राहते. त्यामुळे तिथे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. व त्यामुळे अपघाताचे व आपसांत वादविवादाचे प्रमाण देखिल वाढले आहे. तरी लवकरच हे अतिक्रमण न काढल्यास भडगाव तहसिल कार्यालय समोर आत्मदहन करण्यात येईल असे लेखी निवेदन दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.