कोळगाव येथे महात्मा फुले जयंती निमित्ताने आरोग्य शिबिर संपन्न

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

कोळगाव तालुका भडगाव जिल्हा जळगाव येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले (Mahatma Jyotiba Phule) जयंती निमित्ताने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन केले. गोदावरी फाउंडेशन (Godavari Foundation) जळगाव संचलित डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव येथील डॉक्टरांचे पथक आरोग्य शिबिरासाठी उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांनी क्रांतीसुर्य महात्मा फुले, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले व शिबीरासाठी आलेल्या मान्यवरांचा सत्कार ग्रामस्थांनी केला. त्यानंतर महात्मा फुले यांच्या कार्याची माहिती सांगितली. यावेळी डॉ. किरण जोगावडे, डॉ अंकित भालेराव, डॉ. प्रशांत वानखेडे, डॉ.हिमांशू महाजन, परिचारिका कल्याणी शेहतरे व आम्रपाली मोन, विशाल शेजवळ यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

आरोग्य तपासणी शिबिरामध्ये एकूण 150 रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. रुग्णांच्या विविध प्रकारच्या ऑपरेशन साठी 35 रुग्णांना डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव येथे ऑपरेशन साठी रुग्णालयामार्फत घेऊन जाणार आहेत. याप्रसंगी माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्याम पाटील, सरपंच कविता अंकुश सोनवणे ग्रा. पं.सदस्य सुनंदा नाना माळी, इत्यादी उपस्थित होते. जिल्हा परिषद मराठी शाळा कोळगाव, यांचे अनमोल सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्याम पाटील यांनी केले. तर आभार शिवशंकर महाजन यांनी व्यक्त केले.

Leave A Reply

Your email address will not be published.