टाटा स्टील प्लांटमध्ये गळतीमुळे अपघात; अनेक लोक जखमी…

0

 

ओडिशा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

बालासोर ची रेल्वे घटना ताजी असतांनाच ओडिशाच्या टाटा स्टील प्लांटमध्ये वाफेच्या गळतीमुळे अनेक कर्मचारी भाजले गेल्याची घटना घडली आहे. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेत किती लोक जखमी झाले आहेत याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. टाटा स्टीलने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, ओडिशातील ढेनकनाल येथील टाटा स्टील मेरामंडली वर्क्स येथे वाफ गळती झाल्यामुळे BFPP2 पॉवर प्लांटमध्ये अपघात झाला आहे.

मंगळवारी दुपारी एक वाजता हा अपघात झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. या घटनेत तपासणीचे कार्य आणि जागेवर काम करणाऱ्या काही लोकांना याचा फटका बसला आहे. ज्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर लगेचच सर्व आपत्कालीन प्रोटोकॉल सेवा कार्यान्वित करण्यात आल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.