मेहरूण तलाव येथे स्वच्छतेचा पंधरवडा, “स्वच्छता ही सेवा” अंतर्गत स्वच्छता अभियान…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

आज दि. २९ सप्टेंबर २०२३ रोजी प्रशासक तथा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड जळगाव महानगरपालिका यांच्या मार्गदर्शनाखाली व सह. आयुक्त (SBM) अश्विनी भोसले आणि सह. आयुक्त(आरोग्य) उदय पाटील यांच्या पर्यवेक्षणांतर्गत जळगाव शहर महानगरपालिका व NCC, NSS, केशव स्मृती प्रतिष्ठान, नेहरू युवा केंद्र, प्लॉगर्स ग्रुप जळगाव, रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने श्री विसर्जनानंतर सकाळी ८.०० वाजता मेहरूण तलाव येथे स्वच्छतेचा पंधरवडा, स्वच्छता ही सेवा अंतर्गत स्वच्छता अभियान घेण्यात आले. यावेळी सर्व अस्ताव्यस्त पडलेल निर्माल्य, कचरा व प्लास्टिक संकलित करण्यात आले.

यावेळी राष्ट्रीय सेवा योजना चे विद्यापीठाचे संचालक डॉक्टर सचिन नांद्रे, जिल्हा समन्वयक डॉ. दिनेश पाटील, शुभम वाणी प्लॉगर्स गर्स ग्रुप, प्रो. श्रिया कोगटे व रायसोनी कॉलेजचे विद्यार्थी, केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष व त्यांची टीम, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र, अजिंक्य गवळी व  जळगाव महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी स्वच्छतेची शपथ घेण्यात आली.

जळगाव शहर महानगरपालिकेकडून प्रशासक तथा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांनी स्वच्छ्ता मोहिमेत सहभाग नोंदविल्याबद्दल सर्वांचे आभार प्रकट केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.