‘वास्तव’ फेम ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचं निधन

0

मुंबई,लोकशाही न्यूज नेटवर्क 

मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे (Senior Actor Sunil Shende) यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  रात्री १ वाजता मुंबईतील विले पार्ले याठिकाणी असणाऱ्या राहत्या घरी त्यांचे निधन झाले.

सुनील शेंडे यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटातून अनेक भूमिका साकारल्या होत्या. त्यांचे रुबाबदार व्यक्तिमत्त्व आणि खडा आवाज यामुळे पोलीस, राजकारणी अशा विविध भूमिकांतून ते लोकांच्या लक्षात राहिले. मराठी तसंच हिंदी सिनेसृष्टीत काम केलेल्या सुनील शेंडे यांच्या पश्चात पत्नी ज्योती, दोन मुले ऋषिकेश आणि ओंकार, त्याचप्रमाणे सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

मराठीशिवाय त्यांनी वास्तव, गांधी, सरफरोश या सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. निवडुंग (१९८९), मधुचंद्राची रात्र (१९८९), जसा बाप तशी पोर (१९९१), ईश्वर (१९८९), नरसिम्हा (१९९१) या सिनेमांमधून त्यांनी विशेष लोकप्रियता मिळवली. त्यांच्या जाण्याने मराठी सिनेविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.