Saturday, January 28, 2023

शिक्षकाचे बंद घर फोडले; १२ लाखांचा ऐवज लंपास

- Advertisement -

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

चाळीसगाव शहरातील शास्त्री नगर येथील बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील ११ लाख ६९ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दत्तात्रय भिला मालपूरे (वय ५२, रा. शास्त्री नगर, योगेश कॉलनी, चाळीसगाव) हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. शिक्षक असून खासगी शाळेत ते नोकरीला आहे. ११ नोव्हेंबर रोजी दुपारी २ ते १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता घर बंद असतांना अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून घरातील ११ लाख ६९ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने असा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली.

- Advertisement -

दरम्यान दत्तात्रय भिला मालपूरे घरी आल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दत्तात्रय मालपुरे यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आव्हाड करीत आहे.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे