२५ वर्षीय तरुणाची गळफास घेत आत्महत्या

0

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

पाचोरा येथील २५ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आलीय.  पाचोरा नगरपालिकेत कंत्राटी पदावर कार्यरत असलेले अनिल बागुल (वय २५, रा. जवाहर हौसिंग सोसायटी) या तरूणाने रविवारी १४ ऑगस्ट रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरात गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली. हा प्रकार बाजुच्या खोलीत असलेल्या त्यांच्या परिवाराच्या लक्षात येताच परिवारातील सदस्यांनी एकच आक्रोश केला.

परिवाराच्या सदस्यांनी अनिल बागुल यांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी अनिल बागुल यांना मृत घोषित केले. घटनेबाबत पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मयत अनिल बागुल यांचे पश्चात्य वृद्ध आई, वडिल, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन भाऊ असा परिवार असुन अतिशय मनमिळाऊ व हसमुख स्वभावाचे अनिल बागुल यांच्या आत्महत्यामागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.