ट्रोलिंगमुळे १६ वर्षीय इन्फ्लुएन्सरने केली आत्महत्या

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

मध्यप्रदेशातील उज्जैनमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. सोशल मीडियावरील व्हिडिओ वर येणाऱ्या कमेंटला कंटाळून एका १६ वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने आत्महत्या करत आपले जीवन संपवले आहे. ही घटना २१ नोव्हेंबरला घडली आहे. त्याने राहत्या घरी गळफास घेत आपले जीवन संपवले आहे. घरामध्ये कोणीही नव्हते त्यावेळी त्याने हे टोकाचं पाऊल उचललं आहे.

नागझिरी पोलीस स्टेशनमधून मिळालेल्या माहितीनुसार, अद्याप हत्येमागील कारण अस्पष्ट आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास अधिक सखोल करत आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरबाबत त्याच्या वडिलांसह, शेजारी राहणाऱ्या लोकांचा पोलिसांनी जबाब नोंदवून घेतला आहे. पोलिसांनी त्याचा मोबाईल जप्त केला असून त्याचे सोशल मीडिया अकाऊंट तपासून विविध माहिती गोळा केली जात आहे.

 

नेमकं घडलं तरी काय?
त्याने दिवाळीमध्ये इंस्टाग्रामवर एक रिल शेअर केली. शेअर केलेल्या रिलमध्ये त्या इन्फ्लुएन्सरने मेकअप करून साडी परिधान केलेली दिसत आहे. त्या व्हिडीओमध्ये त्याने अगदीच मुलींसारखे हावभाव दिलेली दिसत आहे.

याच व्हिडीओवरून त्याला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. नेमकी त्याने आत्महत्या का केली? त्याच्या हत्येमागील मुख्य कारण काय? याबद्दलची माहिती पोलिसांना मिळालेली नाही. सध्या पोलीस त्याच्या आत्महत्येचा अधिकाधिक तपास करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.