अचानक पोटात लागले दुखू ; चिमुकलीचा हॉस्पिटलमध्ये नेतांना वाटेतच दुर्दैवी मृत्यू…

0

 

पहूर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

पहूर कसबे येथील लेले नगर भागात राहणाऱ्या ९ वर्षीय बालिकेचा अचानक पोटात दुखू लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. शाळेचा पहिला दिवस आणि  बालदिन तिच्या शाळेचा अखेरचा दिवस ठरला.

सविस्तर वृत्तसे की, दिव्या कैलास बनकर ही ९ वर्षीय चिमुकली जिल्हा परिषद शाळेच्या इयत्ता दुसरीत शिकत होती. दिवाळीच्या सुट्ट्यांनंतर काल शाळेचा पहिलाच दिवस असल्याने ती मोठ्या उत्साहाने शाळेत गेली. बाल दिनानिमित्त शाळेत आयोजित कार्यक्रमात तिने सहभाग घेतला. मात्र कालचा बालदिन तिचा शाळेचा अखेरचा दिवस ठरला. आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास तिच्या पोटात दुखू लागले. आई-वडिलांनी लागलीच तिला गावातील खाजगी रुग्णालयातत नेले. त्यानंतर पुढील उपचारासाठी जळगावला घेऊन जात असतानाच १० वाजेच्या सुमारास दिव्याची प्राणज्योत मालवली. दुपारी शोकाकुल वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.