१८ वर्षीय तरुणाची धावत्या रेल्वेखाली आत्महत्या

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

तरूणाने धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस घडली आहे. प्रसनजीत प्राणकीशन कबीराज (वय १८, रा. बलीदेवांगंज जि. हुगली, पश्चिम बंगाल, ह.मु. मारोती पेठ, जळगाव) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. दरम्यान आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

प्रसनजीत कबीराज हा गेल्या दीड महिन्यांपासून सोने कारागिर म्हणून काम करण्यासाठी जळगावात आला होता. मलाईकर यांच्याकडे तो सोन्याची दागिने तयार करण्याचे काम करून उदरनिर्वाह करत होता. सोमवारी १८ एप्रिल रोजी दिवसभर काम केल्यानंतर रात्री १० वाजता तो आपल्या सहकार्‍यांना मी बाहेरुन नाश्ता करुन येतो असे सांगून दुकानातून बाहेर पडला.

त्यानंतर त्याने आसोदा रेल्वे गेटजवळील अपलाईनवरील खांबा क्रमांक ४२० ते ४२२ येथे धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. स्टेशन मास्तर एम. अग्रवाल यांनी या घटनेची माहिती शनिपेठ पोलिसांना दिली. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक सुरेश सपकाळे व सहाय्यक फौजदार रघुनाथ महाजन यांनी घटनास्थळी जाऊन त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात असून दरम्यान मायताकडे मोबाईल व आधाराकार्ड आढळून आले. त्यावरुन त्याची ओळख पटली. प्रसनजीत हा एकूलता एक मुलगा होता.

 

Leave A Reply

Your email address will not be published.