तेलंगणामध्ये बांधकामाधीन स्टेडियमचा काही भाग कोसळून तीन मजूर ठार, तर अनेक जखमी…

0

 

तेलंगणा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

तेलंगणातील रंगा रेड्डी जिल्ह्यातील मोइनाबाद गावात एक मोठी दुर्घटना घडली आहे. बांधण्यात येत असलेल्या स्टेडियमचा एक भाग कोसळला. या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. यासोबतच येथे १० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. पीडितांना रुग्णालयात पाठवण्यात आले असून, अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.

ही दुर्घटना घडली तेव्हा तेथे सुमारे 14 मजूर काम करत होते. मृत मजूर बिहार आणि पश्चिम बंगालमधील रहिवासी होते. अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नसून, बांधकामात निकृष्ट साहित्याचा वापर करण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच हा भीषण अपघात झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.