जी. एच. रायसोनी महाविद्यालयात “भारतीय भाषा उत्सव” साजरा

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव, ता. २० : विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशभरातील उच्च शिक्षण संस्थांना ‘भारतीय भाषा उत्सव’ दरवर्षी साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे देशात पहिल्यांदाच भारतीय भाषा उत्सव उच्च शिक्षण संस्थांमध्ये साजरा केला जात असून या निमित्ताने जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातही हा दिवस मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने जर्मन, जापनीज फ्रेंच व इंग्लिश भाषा अभ्यास विभागातर्फे वक्तृत्व स्पर्धा, स्वरचित काव्यलेखन स्पर्धा, ‘भारतीय भाषा संवर्धनाचे उपाय’ या विषयावरील निबंधलेखन स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल हे प्रमुख पाहुणे व कार्यक्रमाचे मार्गदर्शक अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.

या कार्यक्रमात सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या विध्यार्थ्यानी देखील मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता. प्रा. प्रिया टेकवानी यांनी विशेष योगदान देत या उपक्रमाचे समन्वय साधले तर या वेळी महाविद्यालयातील प्रा. डॉ. सौरभ गुप्ता, प्रा. बिपासा पात्रा, सायकॉलॉजिस्ट पूनम गेडाम, फ्रेंच ट्रेनर शरयू भुते, जर्मन ट्रेनर बिपीन भिमते व जापनीज ट्रेनर रोहन रोकडे यासह प्राध्यापक-प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते. तसेच साक्षी पोहाणी व साहिल वर्मा या विध्यार्थ्यानी सूत्रसंचालन केले. सदर उपक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व अकॅडमीक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.