मोठा निर्णय ! १० वीच्या विद्यार्थ्यांना ‘त्या’ प्रश्नासाठी मिळणार १ गुण

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क 

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. इयत्ता दहावीच्या परीक्षेत विज्ञान भाग एक या विषयाच्या प्रश्नपत्रिकेत सर्वात लहान अणू कशाचा, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्याचे उत्तर काहींनी हेलियम तर काहींनी हायड्रोजन लिहिले आहे. दोन्ही उत्तरे बरोबर असल्याने यापैकी एक जरी उत्तर विद्यार्थ्यांनी लिहिले असल्यास त्याला एक गुण देण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे.

जूनच्या पहिल्या आठवड्यात इयत्ता बारावीचा निकाल जाहीर होणार असून दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल दहा जूनपर्यंत जाहीर होईल, असे बोर्डाचे नियोजन आहे. आता दहावीच्या विज्ञान भाग- एकच्या त्या प्रश्नाचे उत्तर हेलियम किंवा हायड्रोजन यापैकी एक लिहिलेल्या विद्यार्थ्यांना सरसकट एक गुण दिला जाणार आहे. मात्र, उत्तर न लिहिलेल्यांना गुण मिळणार नाही, असेही बोर्डाने स्पष्ट केले आहे.

इयत्ता दहावीच्या विज्ञान भाग-एकच्या प्रश्नपत्रिकेत एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्याची उत्तरे दोन प्रकारची असल्याचे निदर्शनास आले असून काहींनी दुसरे उत्तर लिहिले आहे. त्यामुळे दोन्हीपैकी कोणतेही एक उत्तर लिहिलेले असल्यास त्या विद्यार्थ्यांना एक गुण मिळणार आहे. बोर्डाने तसा निर्णय घेतला आहे.

– औदुंबर उकिरडे, सचिव, पुणे बोर्ड

 

Leave A Reply

Your email address will not be published.