श्रीसंतने व्हिडिओ शेअर करत गौतम गंभीरवर केले ‘हे’ गंभीर अरोप

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

लिजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेत भारताचे माजी खेळाडू गाइतां गंभीर आणि श्रीसंत यांच्यात जोरदार वाद झाल्याचे पाहायला मिळत आहे. या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. दरम्यान हा वाद झाल्यानंतर श्रीसंतने एक व्हिडिओ शेअर करत गंभीरवर मोठे आरोप केले आहे. यासह त्याने मैदानात नेमकं काय घडलं याबाबत खुलासा केला आहे.

लिजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेतील एलिमिनेटरच्या सामन्यात इंडिया कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यांमध्ये ६ शतकांचा खेळ झाल्यानंतर हा वाद सुरु झाला. त्यावेळी इंडिया कॅपिटल्सने ६० धाव केल्या होत्या. तर गौतम गंभीर ५१ धावांवर नाबाद होता. व्हायरल हो असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, गाइतां गंभीर आणि श्रीसंत एकमेकांसोबत वाद घालतांना दिसून येत आहे. यादरम्यान इतर खेळाडू श्रीसंतला थांबवताना दिसून येत आहे.

 

काय म्हणाला श्रीसंत?
या सामन्यांदरम्यान व्हिडिओ शेअर करत श्रीसंतने गौतम गंभीरवर मोठे आरोप केले. तो म्हणाला की, “मिस्टर फायटरसोबत जे काही घडलंय मला काहीतरी स्पष्टीकरण द्यायचं होत. जो नेहमीच आपल्या सहकाऱ्यांसोबत भांडतो, तो आपल्या वरिष्ठ खेळाडूंचाही आदर करत नाही. ज्यात वीरु (सेहवाग) भाई आणि इतर खेळाडूंचा समावेश आहे. आजही तसंच काहीतरी घडलंय. कारण नसतांनाही तो मला काहीतरी बोलत होता. जे खूप असभ्य होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.