६५ वर्षीय प्रसिद्ध साऊथ दिग्दर्शकाचे निधन

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

साऊथ इंडियन फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक प्रकाश कोलेरी यांच्याविषयीची धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्यांचे निधन झाले असून, घरातच त्यांचा मृतदेह सापडला आहे. त्यांच्या निधनानं चाहत्यांना मोठा धक्का बसला असून, टॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून साऊथ इंडस्ट्रीमधून सेलिब्रिटींच्या निधनाच्या बातम्या समोर येत आहे. त्यात प्रकाश कोलेरी यांच्या बातमीनं साऊथ फिल्म इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध गायिका मलिक राजपूत यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यानंतर आता ६५ वर्षीय दिग्दर्शक प्रकाश कोलेरी यांच्या अचानक निधनाने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

प्रकाशजी हे त्यांच्या घरी एकटेच राहत होते. त्यांच्या चित्रपटाविषयी सांगायचे झाल्यास त्यांनी ‘मिजियिथलिल कन्नीरुमयी’ (१९८७) या चित्रपटापासून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्या चित्रपटाला जाणकारांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. २०१३ मध्ये आलेला ‘पट्टुपुष्ठकम’ हा शेवटचा चित्रपट होता.

Leave A Reply

Your email address will not be published.