सर्पदंशाने सामनेर येथील शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू…

0

 

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

तालुक्यातील सामनेर येथील शेतकरी शेतातून घरी येत असतांना, त्यांना विषारी सापाने चावा घेतल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ३ आॅक्टोबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सामनेर ता. पाचोरा येथील शेतकरी संजय लक्ष्मण साळुंखे (५०) हे ३ आॅक्टोबर रोजी सकाळी शेतात पिक पाहण्यासाठी गेले होते. दरम्यान ९ वाजेच्या सुमारास संजय साळुंखे हे घरी येत असताना त्यांना रस्त्यात एका विषारी सापाने दंश केला. घटनेची माहिती ग्रामस्थांना मिळताच संजय साळुंखे यांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ दिलीप वाघमोडे हे करीत आहे. मयत संजय साळुंखे यांचे पश्चात पत्नी, एक मुलगा, एक भाऊ, एक बहिण असा परिवार आहे. त्यांच्या अकस्मात निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.