अवयवदान काळाची गरज – प्रा.डॉ शुभांगी घुले

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

मरणोत्तर अवयवदान केल्यास इतर व्यक्तींना जीवनदान मिळू शकते, यासाठी अवयवदान करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन शरिर शास्त्र विभागातील प्रा.डॉ शुभांगी घुले यांनी केले.

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या आदेशानुसार डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे शुक्रवार दि.७ एप्रिल रोजी अवयव दान जनजागृती चा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे मेडिकल सुपरिटेडेंट डॉ.प्रेमचंद पंडित, अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर, रजिस्ट्रार प्रमोद भिरुड, डॉ सुभाष बडगुजर, डॉ आशिष कुलकर्णी या मान्यवरांची उपस्थिती होती. मान्यवरांचा हस्ते दीप्रज्वलन व धन्वंतरी पूजन करण्यात आले.

याप्रसंगी डॉ घुले यांच्यासह डॉ प्रेमचंद पंडित यांनी मार्गदर्शन केले. तसेच आपण भावी डॉक्टर आहोत आजपासून आपण इतरांना अवयव दानाचे महत्व पटवून देऊ या असा संकल्प करून घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरुणराज नन्नवरे या विद्यार्थ्याने केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आयोजकांसह गजानन जाधव यांचे सहकार्य लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.