धक्कादायक; देवदर्शनाला जातांना घडला भीषण अपघात

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

मुंबईहून (Mumbai) शिर्डीला दर्शनाशाठी चाललेल्या बसला नाशिक(Nashik)-मुंबई महामार्गावर अपघात झाल्याची घटना आज सकाळी घडली. या अपघातात एक जण जागीच ठार झाला, तर 12 जण जखमी झाले. मेहमूद सुभेदार शेख असे मयत व्यक्तीचे नाव आहे. नाशिक-मुंबई महामार्गावर आज सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास बोरटेंभे येथील पोद्दार शाळेसमोर ही घटना घडली. रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून येणाऱ्या लक्सरी बसने जोरदार धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच घोटी येथील महामार्ग पोलीस केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना घोटी टोलच्या रुग्णवाहिकेतून जखमींवर इगतपुरी येते उपचार सुरु आहे.

मुंबईहून शिर्डीला दर्शनासाठी चालली होती बस

मुंबई-नाशिक महामार्गावर बोरटेंभे येथील पोद्दार शाळेसमोर एक ट्रक नादुरस्त अवस्थेत रस्त्याच्या कडेला उभा होता. खबरदारी म्हणून ट्रकच्या आजूबाजूला सेफ्टी कोन लावण्यात आले होते. यादरम्यान ज्वेल फिश ट्रॅव्हल्सची खाजगी बस मुंबईहून प्रवाशांना शिर्डीकडे दर्शनाला जात होती. बसच्या चालकाला पुढे असणाऱ्या ट्रकचा अंदाज न आल्याने त्याने उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली.

अपघातात ट्रक चालक जागीच ठार

या धडकेत ट्रकच्या मागे काम करणारा ट्रक चालक मेहमूद सुभेदार शेख हा जागीच ठार झाला. बस चालक महेंद्र पाल हा गंभीर जखमी झाला असून, इतर 11 जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत काही जखमींना इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. काही रुग्णांना विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.