ज्येष्ठ माहिती अधिकार प्रशिक्षक व मार्गदर्शक स्व.आर बी (नाना) पाटील यांची उद्या श्रध्दांजली सभा…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

अत्यंत निगर्वी स्वभावाच्या आर बी (नाना) पाटील यांनी माहितीच्या अधिकाराबाबत प्रशिक्षण देवून नागरिकांना सजग केले होते. मराठा मंगल या संस्थेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी मोफत मेळावे घेऊन अनेक उपवर वधू-वर व त्यांच्या पालकांना दिलासा दिला. अत्यंत निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या नानांच्या स्वभावामूळे मित्र परिवार देखिल खुप मोठा होता.

बहुज्ञानी,निस्वार्थी, निगर्वी आणि सेवाभावी व्यक्‍तिमत्व असलेले आर. बी. (नाना) पाटील यांचे शुक्रवार दि. २२ संप्टेबर २०२३ रोजी हदयविकाराने निधन झाले.

या निमित्ताने आज शनिवार, दि ७ ऑक्टोंबर रोजी मायादेवी येथील रोटरी भवन येथे दु. ४ वा या श्रध्दांजली सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यांच्या आठवणी जागवण्यासाठी नागरीकांनी तसेच नानांवर प्रेम करणा-या मित्र मंडळीनी या श्रध्दांजली सभेचं आयोजन केलं आहे. उपस्थितीचे आवाहन स्व. आर.बी.नाना पाटील मित्र परिवाराच्या वतीनं करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९४२२२७९४९ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Leave A Reply

Your email address will not be published.