मानवी जीवनाला अनुकूल ठरणाऱ्या दोन ग्रहांचा शोध

0

ओहियो ;- अंतराळात जीवसृष्टी आहे का किंवा जीवनाला पूरक ठरू शकेल असा कुठला ग्रह अस्तित्वात आहे का, याचा शोध सुरू आहे. ओहियो येथील संशोधकांनी ‘प्रॉक्सिमा सेन्च्युरी बी’ आणि ‘जीजे ८८७ बी’ या दोन ग्रहांचा शोध दुर्बिणीच्या मदतीने घेतला. जीवन फुलवण्यास अनुकूल असलेल्या १० ग्रहांचा शोध घेत असताना हे ग्रह सापडले आहेत.

ओहियोतल्या दुर्बिणींनी शोधलेले ग्रह पृथ्वीसारखे खडकाळ आहेत. या ग्रहांवर ऑक्सिजन, कार्बन डाय ऑक्साईड, मिथेन आणि पाण्याचा शोध घेण्यात आला. ‘प्रॉक्सिमा सेन्च्युरी बी’ आणि ‘जीजे ८८७ बी’ या दोन्ही ग्रहांच्या शोधात दुर्बिणींनी महत्त्वाची भूमिका बजावली. ‘प्रॉक्सिमा सेन्च्युरी बी’वर रोखलेली दुर्बीण फक्त कार्बन डाय ऑक्साईडचा शोध घेऊ शकते. तो ग्रहावर अस्तित्वात असेल तरच त्याचा शोध घेणे या दुर्बिणीला शक्य होते.

या दहापैकी एकाही ग्रहावर पृथ्वीच्या सुरुवातीच्या काळात होती तशी जीवसृष्टी दिसलेली नाही. नेपच्यूनपेक्षा छोट्या ग्रहांकडेच या दुर्बिणी लक्ष ठेवणार आहेत. या संशोधन मोहिमेचे वरिष्ठ हुईहाओ झंग यांच्या म्हणण्यानुसार, ‘प्रॉक्सिमा सेन्च्युरी बी’ आणि ‘जीजे ८८७ बी’ या ग्रहांवर जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप, एक्स्ट्रीमली लार्ज टेलिस्कोप, युरोपीय लार्ज टेलिस्काप, द थर्टी मीटर टेलिस्कोप, जायंट मेंगालन टेलिस्कोपच्या मदतीने ग्रहांची छायाचित्रे मिळवून माहिती घेतली जाणार आहे. प्रत्येक ग्रहाची थेट छायाचित्रे घेणे शक्य नाही; परंतु ते नक्की कशाचे बनले आहेत, याची ढोबळमानाने कल्पना येते, असे संशोधक सांगतात.

एक्सोप्लॅनेट इमेजिंगच्या थेट पद्धतीत यजमान ताऱ्याचा प्रकाश रोखण्यासाठी कोरोनाग्राफ किंवा मोठ्या ग्रहाच्या सावलीचा वापर करणे महत्त्वाचे असते; ज्यामुळे शास्त्रज्ञांना नवीन जगाची क्षीण प्रतिमा टिपता येते. परंतु अशा प्रकारे त्यांचा शोध घेणे कठीण आणि वेळखाऊ असू शकते, म्हणून संशोधकांनी एक्स्ट्रीमली लार्ज टेलिस्कोप निवडला.

ही दुर्बीण हे आव्हान किती चांगल्या प्रकारे हाताळू शकते हेसुद्धा यातून तपासले जाणार आहे. हे करण्यासाठी त्यांनी बायोसिग्नेचर शोधताना ग्रहांच्या आवाजापासून सार्वत्रिक पार्श्वभूमीचा आवाज वेगळे करण्याच्या प्रत्येक दुर्बिणीच्या उपकरणांच्या क्षमतेची चाचणी केली; सिग्नल-टू-नॉईज रेशो म्हणतात, ते जितके जास्त असेल तितके एखाद्या ग्रहाची तरंगलांबी शोधणे आणि त्याचे विश्लेषण करणे सोपे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.