शिरागड येथे श्री सप्तशृंगी मातेच्या यात्रोत्सवाला सुरुवात

0

 

मनवेल ता यावल , लोकशाही न्युज नेटवर्क

येथुन जवळच असलेल्या शिरागड येथील निवासिनी श्री सप्तशृंगी देवीच्या याञेला सोमवार पासुन सूरुवात होणार आहे. ३ एप्रिल पासून यात्रा सुरु होणार आहे ४ एप्रिल रोज मंगळवारी अभिषेक तर ५ एप्रिल पर्यत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कीर्तन ,भारुड ,वही गायन,हवन, पुजा.पाठ सह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यांत आले आहे
कोळन्हावी व शिरागड दोन्ही गावाच्या तापीनदीच्या उंच टेकडीवर श्री सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे हे दैवत “लहान गड म्हृणून ओळखले जाते भावीकांची मनोकामना पुर्ण होऊन सुख समृद्धीची देन देणारे हे दैवत आहे.

जळगाव जिल्ह्यात श्री सप्तशृंगी देवीचे लहान गड म्हणून अख्यायिका अशी आहे की शिरागड येथे दाट अरण्य होते. तापी नदीच्या काठवर शांत मनमोलक वातावरण उंच टेकड्या व दर्याखोय्रार असलेल्याने येथे रुर्षि मुनीचे वास्तव्य होते येथे जगाच्या हितासाठी व कल्याणासाठी जप तप होम हवन पुजा पाठ रूर्षिमुणी करीत होते याची वार्ता राक्षस दैत्यासुराला कळाली असता त्याने येथे आहाकार माजला रुर्षिमुनीनी देवीची आराधना केली असतां श्री सप्तशृंगी देवी येथे प्रगत झाली व दैत्यासुराशी तिने युध्द केले.

दैत्यासुर जीव वाचविण्यासाठी सैरावैर पळ काढला व सप्तशृंगी देवीने वायुवेगाने त्याच्या पाठलाग करुण पहाड पोखरुण नाशिक येथील गडावर वणी येथे या दैत्यासुराचा वध केला.याठीकाणी तिने विश्रांती घेतल्याने नाशिक येथील वणीचे गड म्हणून उदयास आले कोळन्हावी व शिरागड या दोन्ही गावाच्या मध्यभागी तापी नदीच्या कीणारी सप्तश्रुगीमाता देवी विराजमान झाली.तेव्हापासून मोठा गड नाशिक येथील वणीचे गड व शिरागडला लहान गड म्हृणून ओळखले जाते.भावीकांचे श्रध्दास्थान म्हणून भाविक बाराही महीने देवीच्या दर्शनासाठी येतात
श्री सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी भावीक येतात.

दर्शनासाठी रस्त्याची सोय
कोळन्हावी गावातून व धामणगाव फाटा येथून तुरखेडा गावातून सप्तश्रुगी देवीच्या मंदिरात दर्शनासाठी जाता येणार आहे तर यावल आगारातून साकळी मनवेल मार्गे शिरागड बसने गावातुन थेट गडापर्यत रस्ता आहे.
तीन दिवस निवासीनी श्री सप्तश्रुगी देवीच्या यात्रा उत्सवाला मोठी गर्दी असते भावीकांनी श्री सप्तश्रुगी मातेच्या दर्शन शांततेत ध्यावे असे आवाहन संस्था मार्फत करण्यात आले आहे.

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.