शेंदुर्णी सोयगाव रस्त्याच्या कामासाठी रस्ता रोको आंदोलन

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
शेंदुर्णी ता. जामनेर

शेंदुर्णी सोयगाव रस्त्यावरील मोहम्मदिया उर्दू शाळेजवळ मोरी बांधून अपूर्ण काम केलेल्या रस्त्यामुळे वाहतूकदारांचे हाल होत असल्याने नगर पंचायतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्ता रोकोचा इशारा दिला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग जामनेर यांनी सोयगाव रोडवरील मोहम्मदिया शाळेजवळ नऊ महिन्यांपूर्वी मोरीचे व रस्त्याचे काम हाती घेतले. मात्र अजूनही ते पूर्ण झाले नाही. मोरीच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात पाणी साचून रस्त्यावरची वाहतूक ठप्प झालेली आहे. वेळोवेळी सदर विभागाला फोन करून अथवा प्रत्यक्ष भेटूनही काहीही उपयोग होत नाही. जनतेच्या तक्रारी नगर पंचायतीत वारंवार येत असतात.

सदर संबंधित अधिकारी व ठेकेदार यांना प्रत्यक्ष भेटून व फोनद्वारे बोलणी होऊन सुद्धा पुढील कामास सुरुवात होत नाही. त्याला कंटाळून शेवटी नगरपंचायतीने संबंधित विभागाला पत्र पाठवून सांगितले आहे की, सदर कामाकडे बुद्धी पुरस्कर दुर्लक्ष होत आहे, पंचायतीचे असे ठाम मत झाले आहे की, त्या ठिकाणी एखाद्या मोठ्या दुर्घटनेत लोकांच्या मृत्यूची संबंधित विभाग वाट पाहत आहे.

सदर ठिकाणी रिक्षा, वाहतूक गाड्या बऱ्याच वेळेस पलटी होण्याचा प्रसंग ओढवलेला आहे .सदर भागात शाळा, मंदिरे, प्राथनास्थळे आहेत. त्यामुळे विद्यार्थी, भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.

तरी संबंधित सार्वजनिक बांधकाम उपविभाग जामनेर यांनी तीन दिवसांच्या आत कामकाजास प्रत्यक्ष सुरुवात केली नाही तर मंगळवारी सकाळी 11 वाजता सोयगाव रोडवर धरणे आंदोलन व रस्ता रोको करण्यात येईल असा इशारा दिला आहे. सदर पत्रावर नगराध्यक्षा विजया खलसे व उपनगराध्यक्ष निलेश थोरात यांनी स्वाक्षरी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.