शेंदुर्णी नगरपंचायत मार्फत येथे वृक्षांची नैसर्गिक तटबंदी

0

शेंदुर्णी ता.जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

माझी वसुंधरा अभियान 3.0 अंतर्गत नगरपंचायत शेंदुर्णी मार्फत घनकचरा येथे सोन नदीच्या काठावर वड वृक्षांची नैसर्गिक तटबंदी उभारणीचाउपक्रम राबविण्यात आला. दरम्यान शेंदुर्णीच्या नगराध्यक्षा विजया खलसे, मुख्याधिकारी साजिद पिंजारी, उपनगराध्यक्ष  निलेश थोरात, तसेच सर्व नगरसेवक, अमृत खलसे,  गोविंद अग्रवाल, पारस जैन पतसंस्थेचे व्हा.चेअरमन श्रीकांत काबरा, शंकर बारी, पप्पु गायकवाड शहर समन्वयक लोकेश साळी व कर्मचारी वृंद उपस्थित उपस्थित होते.

दरम्यान कार्यक्रमा वेळी वाढते प्रदूषण व वाढत्या तापमानामुळे निसर्गाचा समतोल बिघडत आहे. शेंदुर्णी शहर प्रदूषणमुक्त रहावे यासाठी माझी वसुंधरा अभियान सर्वांपर्यंत पोहोचवावे, असे नगराध्यक्षा विजया खलसे यांनी सांगितले. यावेळी शेंदुर्णी न.पं. चे मुख्याधिकारी साजिद पिंजारी म्हणाले की, वृक्षतोडीमुळे निसर्गाची हानी झाली आहे त्यामुळे सतत तापमानात वाढ होत आहे आणि निसर्गाचे संतुलन ढासळत आहे.त्याच्यातून पर्यावरणाचे प्रश्न निर्माण होत आहे. त्याचे परिणाम म्हणजे उदा. अतिवृष्टी,अनावृष्टि,अकाली पाऊस,तर कुठे ढगफूटी,महापूर सारखे गंभीर प्रसंग ओढावत आहे. त्यामुळे नदी काठ येथील माती पाण्याचा प्रवाहाने वाहून जात असते व निसर्गाची अपरिमित हानी होत असते. माती वाहून जावू नये म्हणून आधुनिक उपचार न करता नदीच्या काठावर देशी वड वृक्षांची सघन पद्धतीने लागवड करण्यात आली. परिसरात गारवा टिकून रहावा,आर्द्रता टिकून रहावी व माती सुरक्षित रहावी म्हणून माझी वसुंधरा अभियानांतर्गत नगरपंचायत शेंदुर्णी मार्फत घनकचरा येथे सोन नदीच्या काठावर आज ५०० वडांचे वृक्षारोपण करून नैसर्गिक तटबंदी निर्माण करण्यात आली. सर्वांना स्वच्छता, आरोग्य, निसर्गाशी असलेली कटिबद्धता निश्चित करण्यासाठी तसेच वसुंधरेशी संबंधीत पृथ्वी, वायू, जल, अग्री आणि आकाश या पंचतत्त्वांवर पर्यावरण व वातावरणीय बदलाचे महत्त्व सांगून स्वच्छ व सुंदर शेंदुर्णी कसे करता येईल, यासंदर्भात उपनगराध्यक्ष श्री. नीलेश थोरात यांनी माहिती दिली. माझी वसुंधरा हे अभियान शासन संपूर्ण महाराष्ट्रात राबवित आहे, ही केवळ सरकारी मोहीम किंवा अभियान न राहता प्रत्येकाने पर्यावरणातील बदल लक्षात घेऊन आपली जीवनशैली पर्यावरणपूरक केली पाहिजे. असेही ते याप्रसंगी म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.