शेंदुर्णी येथे महिलेचा विनयभंग; ४ जणांविरुद्ध गुन्हा

0

पहूर;- शेंदुर्णी येथे महिलेच्या गच्चीवर जाऊन लाईटच्या खांद्यावर आकडा टाकण्यासाठी एकाने अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की शेंदुर्णी येथे दीपक अशोक बारी याने 25 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास फिर्यादी महिलेच्या गच्चीवर जाऊन खांद्यावर आकडा टाकण्यासाठी गेला असता त्याने पीडित महिलेला स्वतःजवळ खेचून तिच्या मनाला त्याच्या उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच पीडित महिलेच्या मुलांना लाकडी लाफने मारहाण केले असता आरोपी अशोक शंकर बारी आणि सयाबाई अशोक बारी व सविता अशोक बारी यांनी शिवीगाळ करून धमकी दिली.

याबाबत पीडित महिलेने ७ रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास पौर पोलीस स्टेशन गाठून चौघान विरुद्ध फिर्याद दिल्यावरून भादवि कलम 354 ( ए) 323 ,504 ,506 ,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाय्यक फौजदार शशिकांत पाटील करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.