अश्लील शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा

0

धरणगाव;-तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या महिलेला अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका विरुद्ध धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की तालुक्यातील एका गावात 19 वर्षीय महिलेच्या घरात सात ऑक्टोबर रोजी सकाळी चार वाजेच्या सुमारास आरोपी अशोक हिरामण भिल हा दारू पिऊन शिवीगाळ करीत असताना त्याला समजण्यास गेल्याने त्याने या गोष्टीचे वाईट वाटून आरोपी अशोकने फिर्यादी महिलेच्या आई व बहिणीला लाठ्या काठ्यांनी मारहाण करून अश्लील शिवीगाळ करून तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याने धरणगाव पोलीस स्टेशनला सात रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास पीडित महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विठ्ठल पाटील करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.